मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर सीबीआयच्या मुंबई विभागाला हे प्रकरण वर्ग करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रियासह आणखी सहा जणांवर सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि या प्रकरणाशी संबंधित इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती, तिचे वडील-आई, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कट रचणे, आत्महत्येस जबाबदार असणे, अडवणूक करणे, चोरी, विश्वासघात करणे, फसवणूक करणे, कट रचणे या अंतर्गत , कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
बिहारमधील पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांना ही सणसणीत चपराक असून त्यांच्या हातातून सुशांत सिंह राजपूत प्रकरण जवळपास गेल्याचे निश्चित झालं आहे. तर शनिवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी असून मुंबई पोलिस सुशांत सिंह प्रकरणाचा तपास अहवाल कोर्टात सादर करणार आहेत. मात्र, आता मुंबई पोलिस या प्रकरणी काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, गुन्ह्याचा कट रचणं, चोरी, फसवेगिरी आणि धमकी देण्यासमवेत इतरही गंभीर आरोप रियावर या एफआयआरअंतर्गत करण्यात आले आहेत. सीबीआयकडून रियाच्या नावे एफआयआर दाखल करण्यापूर्वी सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यामध्ये तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. ज्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस केली होती.