नवी दिल्ली : आज ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. अर्थजगताचे लक्ष लागलेली रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक झाली आहे.
आज गुरुवारी ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच ३.३ टक्के इतका ठेवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ईएमआयबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे कर्जाच्या व्याज दरावर कोणतीही सवलत मिळणार नाही. लोन मोरेटोरिम बाबत दास यांनी पत्रकार परिषदेत काहीच सांगितले नाही. ३१ ऑगस्टला लोन मोरेटोरियमचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे दास यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली होती. अर्थात बँकांकडून लोन मोरेटोरियमला आणखी मुदत वाढ देऊ नये, अशी मागणी केली जात होती.
बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.
कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि लॉकडाउनचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी पतधोरण आढाव्याची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती. त्यामध्ये रेपो दरामध्ये एकूण १.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती.
जून महिन्यात वाढलेल्या महागाईचा दर विचारात घेता आरबीआयकडून यावेळी रेपो रेटमँध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. महागाई दर मार्च महिन्यात ५.८४ इतका होता तो वाढून ६.०९ टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर आरबीआयच्या मीडियम टर्म टार्गेटपेक्षा अधिक आहे. आरबीआयचा टार्गेट २ ते ६ टक्के इतका होता.
आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबर महिन्यात त्याच घट होऊ शकते. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपी ग्रोथ नेगेटिव्ह होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
व्याज दराबाबत घोषणा केल्यानंतर दास यांनी देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्याचे सांगितले. विदेशी चलन साठा वेगाने वाढत असल्याचे ते म्हणाले. करोना व्हायरसमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जानेवारी ते जून या काळात अर्थव्यवस्थेची स्थिती प्रचंड खराब होती, असे दास म्हणाले.
* पतधोरणाची माहिती थोडक्यात आणि मुद्देसूद
– बँकेने रोप रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के इतका ठेवला आहे.
– रिझर्व्ह रोप रेट ३.३ टक्के इतका ठेवला आहे.
– आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केला नाही.
– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याने रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच रेपो दरात कपात केली होती. यापूर्वी मार्च आणि मे महिन्यात झालेल्या बैठकीत मात्र रेपो रेटमध्ये एकूण १.१५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती.
– कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी आणि लॉकडाउनचा परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.