सांगली : कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाशी 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांनी केले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे – मिरज 29.9 (272.3), तासगाव 18 (268.9), कवठेमहांकाळ 14.4 (338.2), वाळवा-इस्लामपूर 29 (635.9), शिराळा 79.7 (635.9), कडेगाव 30 (270.4), पलूस 20.8 (226.6), खानापूर-विटा 13.6 (383.8), आटपाडी 1.7 (247.6), जत 4.3 (200.3).