सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजला आहे. रात्री बारावाजेपर्यंत जिल्ह्यात 283 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याचा हा विक्रम झाला आहे. त्याचबरोबर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण 2 हजार 117 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यातील 1 हजार 887 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 283 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 584 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अक्कलकोटमधील फत्तेसिंह चौकातील 65 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 54 व 60 वर्षीय पुरुष, आगळगाव (ता. बार्शी) येथील 60 वर्षीय महिला, बावी येथील 55 वर्षाची महिला, महूद (ता. सांगोला) येथील 90 वर्षीय पुरुष, पापनस (ता. माढा) येथील 87 वर्षाचे पुरुष, घोंडगे गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षीय पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
* आतापर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या
अक्कलकोट-527, बार्शी-976, करमाळा-186, माढा-347, माळशिरस-293, मंगळवेढा-159, मोहोळ-311, उत्तर सोलापूर-328, पंढरपूर-684, सांगोला-137, दक्षिण सोलापूर-636, एकूण-4 हजार 584