नवी दिल्ली : १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने विवो या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडला आहे. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. तर दुसरीकडे विवोनेच प्रायोजकत्व देण्यास नकार दिल्याचेही वृत्त आहे. यात निश्चित काय झाल, याची माहिती समोर आली नाही.
२०१८ साली बीसीसीआय आणि विवो कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी विवोने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला विवो कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि विवो च्या अधिकाऱ्यांनी वेगळी चर्चा केली. या चर्चेअंती एक वर्षासाठी विवो आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही हे ठरवण्यात आलंय. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या वर्षाच्या मोबदल्यात विवो कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.
काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही विवो कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा विवो कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी विवो सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
* विवोनेच प्रायोजकत्व देण्यास दिला नकार
आता आयपीएल तोंडवर आल्यावर विवोने आपण या वर्षी तरी आयपीएलला प्रायोजकत्व देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता एवढ्या कमी कालावधी प्रायोजक नेमका कुठून आणायचा, हा प्रश्न बीसीसीआयला पडलेला आहे. यावेळी बीसीसीआयने काही पर्यायांवर विचार सुरु केला असल्याचे समजते आहे. यापूर्वी प्रायोजकत्व घेतलेल्या आणि यापूर्वी त्यासाठी उत्सुक असलेल्या कंपन्यांबरोबर बीसीसीआय बोलणी करत असल्याचे म्हटले जात आहे. पण कोणती कंपनी यासाठी तयार होणार, हे मात्र कोडे सुटलेले नाही.
* ‘कोकाकोला’बरोबर प्रायोजकत्वाबाबत चर्चा
आयपीएलची यावेळी कोकाकोला या कंपनीबरोबर प्रायोजकत्व देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. कोकाकोला कंपनीने आयपीएलला प्रायोजकत्व देण्यासाठी यापूर्वी उत्सुकता दाखवली होती, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आता कोकाकोला या कंपनीबरोबर आयपीएलच्या प्रायोजकत्वासाठी चर्चा करत असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.कारण जर कोकाकोलाबरोबर बीसीसीआयने करार केला तर त्यांना पेप्सिकोपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय कोकाकोला या कंपनीबरोबर करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएलच्या प्रायोजत्वासाठी बीसीसीआयची रिलायन्सच्या जिओ या कंपनीबरोबर बोलणी सुरु असल्याचे ऐकिवात आहे.