नवी दिल्ली : आरबीआयच्या आदेशावरुन बँकिंग क्षेत्रातील चालू खात्याबाबात काही बदल झाले आहेत. या निर्णयामुळे बँकांना मदत होईल. कारण यामुळे विविध बँकांमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर पायबंदी आणली जाऊ शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना असे आदेश दिले आहेत की, ज्या ग्राहकांच्या खात्यांवर आधीच रोख रक्कम किंवा ओव्हरड्राप्टच्या माध्यमातून क्रेडिट सुविधा उपलब्ध आहे, त्या ग्राहकांचे चालू खाते उघडण्यात येऊ नये. आरबीआयने कर्जासाठी वेगवेगळ्या खात्यांचा वापर करणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी नवीन उपाय सुचवले आहेत.
चालू खाते कंपनी किंवा व्यावसायिकांसाठी असते, ज्यांना रोज पैशांच्या व्यवहारांची आवश्यकता भासते. ज्या ठिकाणी पैसांचे व्यवहार मोठ्या स्तरावर केले जातात त्याठिकाणी चालू खात्याचा वापर केला जातो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरबीआयच्या नवीन आदेशांनुसार कोणतीही बँक त्या ग्राहकांसाठी चालू खाते उघडणार नाही, ज्यांनी बँकिग प्रणालीकडून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात क्रेडिट सुविधा प्राप्त केली आहे.
नवीन गाइडलाइननुसार सर्व व्यवहार कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खात्याच्या माध्यमातून करण्यात येतील. आरबीआयच्या गाइडलाइननुसार बँक सर्व चालू खाती, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारी खाती नियमित स्वरूपात मॉनिटर करतील. कमीत कमी तिमाही आधारावर ही मॉनिटरिंग केली जाईल.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी चालू खाते असते. रोजच्या पैशांच्या व्यवहारासाठी चालू खाते अधिक फायदेशीर आहे. चालू खात्यामध्ये असणारे पैसे कोणत्याही वेळी बँकेची शाखा किंवा एटीएममधून काढता येतात. खातेधारक कितीही वेळा पैसे काढू शकतात.
व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार चालू खात्यातील पैसा वरखाली होत असतो. बँका या पैशांचा वापर करत नाहीत. बँकांकडून मिळणारी ही खास सेवा आहे. बँकेमधील बचत खात्यातील रकमेवर तुम्हाला व्याज मिळते, मात्र चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही.