Saturday, December 9, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका; महसूलमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Surajya Digital by Surajya Digital
August 8, 2020
in Hot News, सोलापूर
0
ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका; महसूलमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत महसूलमंत्री थोरात बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी शहरातील तर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ग्रामीण भागातील कोरोना स्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असली तर सर्व प्रकारच्या उपचारासाठीचे नियोजन केले असून 23 हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. 65 कोविड केअर सेंटरमध्ये 8715 ची क्षमता असून 20 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1046 तर 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1058 रूग्णांची क्षमता आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणखी 120 बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

महसूलमंत्री थोरात यांनी ‘कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. पुढील 100 दिवसांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे’.

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पुरूष मोठ्या प्रमाणात कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना संसर्ग झाल्यास घरातील इतरांनाही बाधा होते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना ॲड. ठाकूर यांनी केल्या.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 10 हजार 209 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी 517 मयत झाले असून 6675 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 3017 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला सर्व बाबतीत नागरिकांचे सहकार्य मिळत असून कोविड हॉस्पिटल, आरोग्यातील रिक्त पदे, औषधे, ॲम्ब्यूलन्ससाठी सहकार्य करण्याची अपेक्षा श्री. थोरात यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सहायक अधिष्ठाता डॉ. श्रीमती जयस्वाल, अग्रजा वनेरकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. मंजिरी कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, स्नेहल भोसले, मोहिनी चव्हाण, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: #सोलापूर #कोरोना #आढावा #यशोमतीठाकूर #बाळासाहेबथोरात #ग्रामीणशहर
Previous Post

आपण मुख्यमंत्री पत्नी झाल्याझाल्या एक्सेस बँकेने आपली बदली नागपूरहून डायरेक्ट मुंबईला केली

Next Post

सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ मृत्यू तर 311 नवे रूग्ण; पंढरपुरात 115 नवीन बाधित रुग्ण

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ मृत्यू तर 311 नवे रूग्ण; पंढरपुरात 115 नवीन बाधित रुग्ण

सोलापूर ग्रामीणमध्ये नऊ मृत्यू तर 311 नवे रूग्ण; पंढरपुरात 115 नवीन बाधित रुग्ण

Latest News

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

by Surajya Digital
December 6, 2023
0

...

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

by Surajya Digital
December 4, 2023
0

...

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

by Surajya Digital
December 3, 2023
0

...

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

by Surajya Digital
November 28, 2023
0

...

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

by Surajya Digital
November 25, 2023
0

...

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

by Surajya Digital
November 24, 2023
0

...

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

by Surajya Digital
November 23, 2023
0

...

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

by Surajya Digital
November 22, 2023
0

...

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

मोबाईल कंपनीच्या अभियंत्याला मागितली पन्नास हजाराची खंडणी

सूरत-चेन्नई महामार्ग; अंतिम नोटीसीची मुदत संपली, पोलीस बंदोबस्तात सक्तीने ताबा

by Surajya Digital
November 21, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul   Sep »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© Website Design by Digital Buffalo - 9028927697