मुंबई : राज्यात शुक्रवारी 10 हजार 483 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या 4 लाख 90 हजार 262 झाली आहे. बाधितांप्रमाणे बरे होणाऱ्यांची संख्याही आज 10 हजार 906 इतकी होती.
राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 27 हजार 281 नागरिक कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 45 हजार 582 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 300 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या मृत्युदर 3.49 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 229 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत, तर 40 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 31 मृत्यू हे त्याआधीच्या काळातील आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 10 हजार 906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 10 हजार 483 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्के आहे. राज्यभरात 3 लाख 27 हजार 281 रुग्ण बरे झाले असून 1 लाख 45 हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
* मुंबईत 1,236 कोरोनामुक्त
मुंबईत आज कोरोनाचे 862 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 45 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,236 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 93 हजार 897 वर पोहोचली आहे. मुंबईत 45 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 690 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन आता 20 हजार 143 इतकी आहे.
* मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 138 जणांचा मृत्यू
कोरोनाच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 138 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रेल्वे रुग्णालयात 143 जण उपचार घेत आहेत. तर 1,225 जण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले आहेत. बरे होण्याच्या r टक्केवारीचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत आले आहे. रेल्वेच्या कामगारांसोबत त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचादेखील समावेश आहे.