मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करत असताना, या चौकशीवर संशय उपस्थित करत केले जात आहे. सोबतच विरोधी पक्षाकडून आणि नेटकऱ्यांकडून राज्य सरकारवर आरोपही केले जात आहे.
सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा बलात्कार करून हत्या करण्यात करण्यात आली आहे, तसेच सुशांतचीही हत्याच करण्यात आली आहे. आत्महत्याप्रकरणी राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा धक्कादायक आरोप भाजप नेते नारायण राणेंनी केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता या पार्श्वभूमीवर दिशाच्या वडिल सतीश सालियन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांनी एक पत्र लिहले आहे. आपल्या मुलीबद्दल खोटे अहवाल प्रसारित केले जात आहे, असे दिशाच्या वडिलांनी म्हटले आहे.
दिशावरील बलात्कार आणि हत्येच्या या बातम्या सर्व चुकीच्या आहेत. याव्यतिरिक्त माध्यमांचा एक विशिष्ट वर्ग सुशांतच्या आणि दिशाच्या कुटुंबास मानसिक त्रास देत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
तसेच या रचवलेल्या कथा लोकांची दिशाभूल करत आहे. सोबतच त्यांच्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला बाधा आणत आहे, असेही दिशाच्या वडिलांनी या पत्रात म्हटले आहे.
* नारायण राणेंवर एफआयआर होऊ शकते
दिशाची बलात्कार करुन हत्या झाल्याचा आरोप केल्याप्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांच्या विरोधात मुंबई पोलीस एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे. एफआयआर दाखल झाल्यास ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात नवा संघर्ष होईल अशी चर्चा सुरू आहे.
दिशा सालियान प्रकरणी माध्यमांनी रंगवून काही वृत्त दिली आहेत. यामुळे दिशा सालियानची मृत्यू नंतर बदनामी होत आहे. तसेच दिशाच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशा स्वरुपाची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. दिशाच्या वडिलांनी ही तक्रार एका पत्राद्वारे मालवणी येथे एसीपींकडे केलीय. या तक्रारीमुळे नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे.