मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच, संजय दत्तची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय दत्तची ऑक्सिजन लेवल कमी-जास्त होत असल्याने तसेच श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याने त्याला आज सायंकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला सध्या नॉन-कोविड आयसीयू वॉर्डात ठेवण्यात आले असून रुग्णालयात दाखल होताच त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर संजय दत्तचा स्वॅब घेऊन तो कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, संजय दत्तच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. नॉन-कोविड रुग्णावर ज्याप्रकारेच उपचार होतात त्याप्रमाणे संजय दत्तवर उपचार सुरू आहेत, असे लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना लवकरच डिस्चार्जही देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.