अहमदनगर : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ईडीने या प्रकरणात 8 तास चौकशी केली आहे. ते काय इतका वेळ गप्पा मारत होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच थोडं थांबा, तपास सीबीआयकडे गेला आहे. महिनाभरात सत्य समोर येणार आहे, असंही नमूद केलं आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे.
आमदार रोहित पवारांनी बिहार निवडणुकीमुळे सुशांतच्या तपासाला राजकीय वळण लागल्याचे म्हटले होते. खासदार सुजय विखेंनी सुशांतसिंह प्रकरणाचा आणि बिहारच्या निवडणुकीचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. एखाद्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा बाहेर राज्यात झाला आणि त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे संशय व्यक्त केला असता तर मुख्यमंत्र्यांनी काय केलं असतं? उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं. आपल्या सुपुत्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची असते. तिच भूमिका नितीश कुमार यांनी घेतली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुजय विखे म्हणाले, “सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरु झाली आहे. काल शुक्रवारी ईडीनेही 8 तास चौकशी केली. सीबीआय या प्रकरणाचा महिनाभरात तपास लावून सत्या समोर आणेल. त्यावेळी हे सर्व जनतेसमोर येणार आहे. आता हा बॉल सीबीआयच्या कोर्टात आहे. ईडीने 8 तास चौकशी केली आहे, तर त्यात त्यांनी गप्पा तर मारल्या नसतील ना. चौकशी होतेय, मला खात्री आहे लवकरच सत्य समोर येईल.”
* संशयित आरोपी देश सोडून गेला का?
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संशयित असलेली आरोपी एकदा देखील माध्यमांसमोर आलेली नाही. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणातील संशयित असलेली आरोपी देश सोडून गेली की काय, अशी शंका उपस्थित होतं असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखेपाटील यांनी दिली होती. बिहार सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सीबीआयची मागणी केली असून न्यायालयाने देखील त्यास मंजुरी दिली आहे हे स्वागतार्ह आहे.