लातूर : लातूर जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 348 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून उपचारादरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 136 वर पोहचली आहे.
लातूर जिल्ह्यात 15 जुलै पासून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे संचारबंदी लागू करण्यात आली. मध्यंतरी चार दिवस काही अंशी शिथीलताही देण्यात आली परंतु पुन्हा कडकडीत संचारबंदी सुरू झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारच्या अहवालानुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये 60 वर्षीय पुरुष पाटील नगर चाकूर यांचा कृषी पीजी कॉलेज चाकूर येथे मृत्यू झाला. 67 वर्षीय स्त्री सराफा लाईन रोड उदगीर, 35 वर्षीय स्त्री नळेगाव ता. चाकूर यांचा सामान्य रुग्णालय उदगीर येथे मृत्यू, 70 वर्षीय पुरुष नारायण गल्ली शिरुर अनंतपाळ आणि 60 वर्षीय पुरुष अहमदपूर, 32 वर्षीय पुरुष भिंगोली ता. शिरुर अनंतपाळ, 60 वर्षीय पुरुष रेणापूर, 65 वर्षीय स्त्री अहमदपूर, 41 वर्षीय पुरुष अलीम नगर उदगीर यांचा लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात मृत्यू झाला.