कराड : गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्रातील विविध भागांचा करोनाच्या पार्श्वभूमीवर दौरा करत आहेत. आज पवार कराडमध्ये पोहोचले असताना त्यांच्या बैठकीला काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गैरहजर होते. आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही, अशी तक्रार करणारे भाजप नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली.
या बैठकीला भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मात्र हजर होते. मागच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीलाही ते हजर होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हजेरीमुळे तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गैरहजेरीमुळे या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सूरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई , कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री (शहर ) सतेज पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील हे उपस्थित आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विविध ठिकाणी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार आज रविवारी सातारच्या दौऱ्यावर होते. मात्र, यावेळी पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कराडमधील बैठकीला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गैरहजर राहिल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीतील पृथ्वीराज चव्हाणांच्या या गैरहजेरीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे सध्या मुंबईत असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
* अनेकांच्या भुवया उंचावल्या
पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळेच चव्हाण या बैठकीला हजर नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले देखील पवारांच्या या आढावा बैठकीला गैरहजर राहिले असले तरीही आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी मात्र या बैठकीला हजेरी लावली होती. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हजेरीमुळे तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनंतर दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे लागोपाठ दोन दौऱ्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणखी मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही बोललं जात आहे.