सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या रविवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 54 रुग्ण आढळून आले आहेत. आज चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 53 पुरूष आणि 38 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 422 झाली असून त्यामध्ये पुरुष 3 हजार 144 तर महिला 2 हजार 278 रुग्णांचा समावेश आहे. आज सिध्देश्वर हॉस्पिटलमधील 70 वर्षाचे पुरूष, विडी घरकुल परिसरातील 80 वर्षाची महिला आणि 70 वर्षाचे पुरूषा तर यशोधरा हॉस्पिटल परिसरातील 57 वर्षाचे पुरूष अशा चार जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 380 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 253 तर महिला 127 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 432 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 378 अहवाल निगेटिव्ह तर 54 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 38 हजार 721 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 33 हजार 244 आहे. तर 5 हजार 422 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 107 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 935 आहे.