मुंबई : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता महाराष्ट्र सरकार कोरोना टेस्टिंगसाठी एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानात केवळ आवाजाच्या सहाय्यानेच कोरोना चाचणी, तपासणी होणार आहे. खास टेस्ट उद्या मंगळवारपासून मुंबईत सुरू होत आहे.
ही माहिती स्वतः शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आदित्य यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट केले आहे, की ‘बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. आरटी-पीसीआर टेस्टिंगदेखील होत राहील, मात्र, जगभरात टेस्ट केल्या गेलेले तंत्रज्ञानान हे सिद्ध करतात, की महामारीने आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला आणि आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला मदत केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करोना विषाणूच्या रुग्णांच्या चाचण्या करणे ही मोठी देकेदुखीची प्रक्रिया आहे. मात्र, आता त्याला सुलभ करणारी एक खास टेस्ट उद्या मंगळवारपासून मुंबईत सुरू होत आहे. यामध्ये माणसाच्या आवाजातील बदलावरून संबंधितांना करोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही हे समजणार आहे.
इस्राइल आणि अमेरिका देशात असे तंत्रज्ञान वापरले जात आहे. अवघ्या अर्ध्या तासात या चाचणीमुळे करोनाचे रुग्ण समजणार आहेत. गोरेगांव येथील नेस्को कोविड सेंटर येथे सर्वप्रथम अशी चाचणी घेण्यास सुरुवात होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे अडिशनल कमिश्नर सुरेश काकानी यांनी ही माहिती दिली आहे. त्यावर वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे.