सोलापूर : कोरोनाचा विळखा ग्रामीण भागामध्ये घट्ट होत चालला आहे. शहरापापेक्षा जास्त रुग्णसंख्या ग्रामीण भागात झाली आहे. पूर्वी रुग्णसंख्येत शहर पुढे होते आता ग्रामीण भागात वाढ झाली आहे. तर मृत्यूचे प्रमाण मात्र शहरी भागात जादा आहे.
ग्रामीणने शहराला मागे टाकले आहे. सोलापूर ग्रामीण भागात आजच्या अहवालानुसार आजही दहा मृत्यू तर नव्याने 345 बाधित रुग्ण आढळले. आजच्या अहवालानुसार 173 जणांनी मात केली. ग्रामीण भागात एकूण बाधित 5 हजार 902 संख्या झाली असून मृत्यू 172 तर कोरोनामुक्त 3 हजार 333 अशी रुग्णसंख्या आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी सर्वाधिक 124 रूग्ण पंढरपूर तालुक्यात सापडले तर 54 रुग्ण माळशिरस तालुक्यात सापडले. आतापर्यंत ग्रामीणची रूग्ण संख्या 5 हजार 902 झाली असून 172 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या अहवालानुसार बार्शी, अक्कलकोट आणि पंढरपूर, माढा तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा तर सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरातील बाधितांच्या संख्येला (5 हजार 460) आज ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येने (5 हजार 902) मागे टाकले आहे. ग्रामीणने शहरास 422 रुग्णसंख्येने मागे टाकले आहे. मृत्यूचा दर शहरात जास्त असून ग्रामीणमध्ये कमी आहे. मृत्यूचा टक्का आणि बाधितांची संख्या घटल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत आहे. मात्र गेल्या तीन दिवसात ग्रामीणमध्ये वाढला आहे
सांगोल्यातील घेरडीत 24 एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. ग्रामीणची सुरवात सांगोल्यातून झाली; परंतु आजच्या घडीला बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. ग्रामीण भागात टेस्टिंग वाढल्या म्हणून बाधितांची संख्या वाढत आहे. बार्शी, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, कुर्डुवाडी या मोठ्या नगरपरिषदा कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत.
* शहर-ग्रामीणचा अहवाल
आतापर्यंत शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 460 तर ग्रामीण भागात 5 हजार 902 झाली आहे. शहर आणि ग्रामीण मिळून एकूण रुग्णसंख्या 11 हजार 362 झाली आहे. ग्रामीणने शहराला 442 रुग्णसंख्येने मागे टाकले आहे. शहरात एकूण मृतांची संख्या 383 तर ग्रामीण भागात 172 झाली आहे. दोन्ही मिळून मृतसंख्या 555 झाली आहे.