नवी दिल्ली : राहत इंदोरींची वाजपेयींवरची ही वादग्रस्त शायरी होतीय वायरल:- कोरोनाची लागण होऊन हृदयविकाराच्या झटक्याने डॉ राहत इंदोरी यांचे निधन झाले,व त्यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नैराश्य पसरले.अनेकांना दुःखातुन,विरहातुन राहत देणारी त्यांची शायरी अचानक सुन्न झाली, काल पासुन त्यांना वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लेटफ्रॉम वरून श्रद्धांजली वाहिली. “बुलाती ही मगर जाने का??….. नही” ह्या त्यांच्या शायरी वर लोकांनी खुप प्रेम केलं आणि ‘जानेका नहीं म्हणत म्हणत तुम्ही स्वतः निघुन गेलात ये गलत हें ‘अश्या काही शब्दात लोकांनी आठवणींना उजाळा दिला..
लोकशाही मध्ये दोन्ही प्रवाह पाहायला मिळतात काही ठिकाणी त्यांच्या जुन्या विडिओ वर ज्यात त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींना दौ कौडी म्हणुन स्वतःच्या शायरीला करोडोंची उपमा दिली होती २००१ मध्ये अटलजींची गुढघ्याची शस्त्रकिया झाली होती आणि यासंदर्भात राहतजीं हे म्हणाले
” रंग चेहरे का ज़र्द कैसा है
आईना गर्द-गर्द कैसा है
काम घुटनों से जब लिया ही नहीं
फिर ये घुटनों में दर्द कैसा है”
आणि यावरूनच अटलजींच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वर आक्षेप घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बाबतीत ट्विट न केल्याचे कारण सुद्धा हेच आहे का असा सवाल नेटकर्यांनी केला.