मुंबई : एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 13 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. 13 सप्टेंबरला संपूर्ण देशात नीटची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने तिसऱ्यांदा राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली आहे. एमपीएससीने अधिकृत पत्रक काढून हा महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसंच उमेदवार व परीक्षा आयोजनातील कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020 ही आता 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.