बंगळुरु : सोशलमीडिया दुधारी आहे. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे. गैरवापर केल्यानंतर काय होते, अनेक घटनांमधून दिसून आले आहे. तरीही बोध घेतला जात नाही. अशीच एक घटना कर्नाटकात घडली असून यात दोघांचा मृत्यू तर 110 जणांना अटक झाली आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ति यांचा भाचा पी नवीन यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर बंगळुरु शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात संतप्त जमावाने आमदार श्रीनिवास मूर्ती घराची तोडफोड केली. यावेळी जाळपोळही करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदाराचा नातेवाई पी नवीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पी नवीन यांना देखील अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात 144 कलम लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसचे आमदाराचा नातेवाई पी नवीन यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह फोटोवरुन वादाला तोंड फुटले. धार्मिक भावना दुखावलेला अल्पसंख्याकांच्या गटाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे पी नवीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
यात जवळपास 60 पोलिस जखमी झाले आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्थानकाच्या अंतर्गत कलम 144 लागू करण्यात आले आहे.