सोलापूर : विराट फ्युचर कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणूक केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त रकमेचा परतावा मिळतो, असे आमिष दाखवत दोघांनी सातजणांची तब्बल 34 लाखांना फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या कंपनीत गुंतवणूक केलेल्यांनी आज गुरूवारी पत्रकार परिषदेत घेत हे मोठे रॅकेट असून यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याचा आरोप करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. कामठा हरिदास सोनी (रा. पनवेल, नवी मुंबई) व फजलोद्दीन फकरोद्दीन डोंगरी (रा. मोहोळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. डोंगरी याल अटक करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विराट फ्युचर कंपनीने 2018 साली बालाजी सरोवर येथे कंपनीच्या गुंतवणुकीच्या योजना सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनार करिता जरीना फिरोज पठाण (वय-45, रा. टिळक नगर,मजरेवाडी) यांना व त्यांच्या पत्नीस बालाजी सरोवर येथे आरोपी सोनी व डोंगरी याने बोलावले होते. या दोघांचा विश्वास संपादन करून त्यांनी कंपनीत रक्कम गुंतवण्यास सांगितले.
या गुंतविलेल्या रकमेचा आर्थिक फायदा भरपूर होईल असे सांगत व त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम भरून घेऊन त्यांना त्याबदल्यात आर्थिक फायदाही झाला. त्यानंतर पती-पत्नीस कंपनीबाबत अधिक विश्वास वाटू लागल्याने दोघांनीही त्यांना मोहोळ येथे बोलून पुन्हा विराट फ्युचर या कंपनीमध्ये अधिक रक्कम गुंतवणूक करण्यास सांगून ती भरून घेतली.
मात्र विराट फ्युचर कंपनीत जरीना यांनी 10 लाख 15 हजार रुपये रक्कम गुंतवणूक केली असून त्यांना कंपनीकडून आतापर्यंत 5 लाख 76 हजार रुपयांचा परतावा आला आहे. दरम्यान सप्टेंबर 2019 नंतर विराट कंपनीने परताव्याची रक्कम देण्यास बंद केली व त्यांनी स्वतःची वेबसाईट देखील बंद केली. सोनी आणि डोंगरी यांच्याकडे गुंतवणूक रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी थोड्या दिवसात बँकेच्या खात्यावर जमा होईल असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली.
डोंगरी आणि सोनी यांनी माझ्यासह इतर लोकांचा विश्वास संपादन करून विराट कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले माझ्यासह गुंतवणूकदारांची 34 लाख 47 हजार रुपये रक्कम गुंतवणूक करून घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार करून फसवणूक केल्याची फिर्याद जरीना यांनी दिली आहे. पुढील तपास पोसई मस्के हे करित आहेत.