- नवी दिल्ली:- 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला.खूप दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर हा सोनेरी दिवस उगवला.यावर्षी आपण 74वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.भारताच्या स्वातंत्र्यात अनेक वीरांचे योगदान आहे ज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे यंदाचा स्वातंत्र्य दिवस घरात बसुनचं साजरा करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टशी निगडित काही घडामोडी आपण पाहुयात.
महात्मा गांधींची समारंभात गैरहजरी:–
भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात सगळ्यात पुढे महात्मा गांधी होते पण 15 ऑगस्ट 1947 च्या समारंभात ते सहभागी झाले नव्हते.पश्चिम बंगालमध्ये नोआखलीत ते उपोषणासाठी बसले होते.हिंदु आणि मुस्लिम लोकांमध्ये चालु असलेल्या सांप्रदायिक दंगलीच्या विरोधात त्यांनी हे उपोषण केले होते.
15 ऑगस्ट 1947 ला लालकिल्ल्यावरून नव्हता फडकला तिरंगा :-
दरवर्षी 15 ऑगस्ट ला देशाचे पंतप्रधान लालकिल्ल्यावरून ध्वजारोहण करतात पण 15 ऑगस्ट 1947 ला अस झालं नव्हतं. लोकसभा सचिवालयाच्या शोधानुसार पंडित नेहरूंनी 16 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले होते.
15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाचे राष्ट्रगीतच नव्हते:-
15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस आपले राष्ट्रगीत अस्तित्वात नव्हते. रवींद्रनाथ टागोरांनी ‘जन-गण-मन’ 1911 मध्ये लिहिले होते परंतु त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता 1950 मध्ये मिळाली.
15 ऑगस्ट ला हेही देश झाले होते स्वतंत्र:-
1) दक्षिण कोरिया :- 15 ऑगस्ट 1945
2) बहरिन:- 15 ऑगस्ट 1971
3) कांगो:- 15 ऑगस्ट 1960
यावर्षीचा स्वतंत्रता दिवस :-
15 ऑगस्ट ला दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेन्द्र मोदी लाल किल्यावर ध्वजारोहण करतील त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल, ते भाषण पण करतील पण नेहमीप्रमाणे लोकसहभाग नसेल.