सोलापूर : पंढरपूर शहर व परिसरात सात दिवसाचा लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा एक दिवसाने वाढविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. आता १४ आॅगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार असल्याचेही ढोले यांनी सांगितले. एक दिवसांनी लॉकडाऊन वाढला असला तरी याबाबत लोकांमध्ये संमीश्र प्रतिक्रिया येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर शहर आणि परिसरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरमध्ये ७ ते १३ आॅगस्टपर्यंत सात दिवसाचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला होता. गरज पडल्यास हा कालावधी पुढे तीन दिवस वाढविणार असल्याचेही सांगितले होते.
सात आॅगस्टपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची नियम आता १४ आॅगस्टपर्यंत असणार आहेत. सकाळी सात ते नऊ दुध विक्री, मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. एक दिवसांनी हा लॉकडाऊन वाढवला असला तरी परत आणखी वाढणार का? याबाबत साशंकता आहे. १५ अॉगस्ट स्वातंत्र्यदिनी पंढरपुरात लॉकडाऊन उठणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.