नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. स्वतः अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी ट्विट करत अमित शहा कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली होती. परंतू काही वेळातचं तिवारी यांनी ते ट्विट डिलीट केल्यामुळे शहा यांच्या प्रकृतीबद्दल संभ्रम वाढला होता. अखेरीस आज खुद्द शाह यांनी आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिल्यामुळे हा संभ्रम आता दूर झाला आहे.
आज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है।
मैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ।
डॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा।
– Amit Shah (@AmitShah) August 14, 2020
अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं.
यावेळी अमित शहा यांनी आपण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या प्रकृतीची काळजी घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. याचसोबत मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत.