Tuesday, May 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

काँग्रेस नेत्यासह एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Surajya Digital by Surajya Digital
August 16, 2020
in Hot News, देश - विदेश
0
काँग्रेस नेत्यासह एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : अमेरिकेत लवकरच निवडणुका होत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पक्षपाती भूमिका घेण्याबाबतचा आरोप झालेले ट्विटर आणि फेसबुकने नवे नियम तयार केले. आता भारतातही फेसबुकच्या नियमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत ट्विट केले आहे. विविध लोकशाही देशांमध्ये फेसबुकचे वेगवेगळी मानके का आहेत?, हा कोणत्या प्रकारचा निष्पक्ष मंच आहे?, हा रिपोर्ट भाजपसाठी नुकसानकारक आहे- या वेळेला भाजपच्या फेसबुकशी असलेल्या संबंधाबाबतचा खुलासा झाला आहे आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांवर भाजपच्या नियंत्रण करण्याच स्वभावही उघड झाला आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील या मुद्द्यावर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना घेरले आहे. दिग्विजय सिंह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक अंखी दास यांना फेसबुकमध्ये नियुक्त केले गेले. ते मुस्लिम विरोधी पोस्ट सोशल मीडियावर अप्रूव्ह करत असतात. या वरून तुम्ही हे सिद्ध केलेत की तुम्ही जो उपदेश करता त्याचे पालन करत नाही.

* भारतात बसलेल्यांनी कारवाईच केली नाही

हा सर्व वाद एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानंतर सुरू झाला. भाजप नेता टी. राजा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना गोळी घालायला हवी असे म्हटले होते असे वॉल स्ट्रीट जनरलच्या वृत्तात म्हटले होते. त्यांनी या पोस्टमध्ये मुस्लिमांना देशद्रोही म्हणत मशीद पाडण्याची धमकी दिली होती. याचा विरोध फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी केला होता. हे कंपनीच्या नियमांच्या विरोधी असल्याचे म्हटले होते. मात्र, कंपनीने भारतात बसणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. यानंतर असदुद्दीन ओवेसी आणि दिग्विजय सिंह यांनी फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.

Tags: #दिग्विजयसिंह #ओवेसी #फेसबुक #विश्वसनीयतेवर #प्रश्नचिन्ह
Previous Post

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी धोनीला दिला लोकसभा लढवण्याचा सल्ला; धोनींकडून उत्तर नाही

Next Post

राज ठाकरेंची माफी मागत या शहराध्यक्षाने केली आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल वाचा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राज ठाकरेंची माफी मागत या शहराध्यक्षाने केली आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल वाचा

राज ठाकरेंची माफी मागत या शहराध्यक्षाने केली आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल वाचा

वार्ता संग्रह

August 2020
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697