पुणे : महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्षे राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांचा गौरव केला आहे.
सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी यासाठी भाजप नेते आग्रही असताना देवेंद्र फडणवीस यांना आता उपरती झाली आहे. पुणे येथे सुशांतसिंह आत्महत्या तपासाप्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘सुशांत प्रकरण सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण त्यांनी राजकीय दडपणाखाली काम करू नये. बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही असे सांगतानाच ‘पार्थ प्रकारांचा विषय पवार कुटुंबियांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचं नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.