नांदेड : मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सुनीर इरावार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुनील इरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहतात. त्यांनी काल शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी इरावार यांनी सुसाईड नोट लिहिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी टोकाचे पाऊल उचलले. इरावार यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
* अखेरचा जय महाराष्ट्र
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’
“यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील”
“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो.” असे सुनील इरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.