सांगली : खानापूर तालुक्यात गेली दोन – तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर – कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यातच चिंचणी ( ता.कडेगाव ) येथील तलावातील पाणी सोनहिरा ओढ्यात सोडले आहे. परिणामी, येरळानदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रामापूर – कमळापूर या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेतीच्या कामासाठी ये – जा करणे बंद झाले आहे. मध्यंतरी रामापूर – कमळापूर पुलाची उंची वाढवावी , यासाठी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात लाख रूपये खर्चून डागडुजी केली होती. परंतु पूलाची उंची वाढविण्याचा प्रश्न रखडलेला आहे.
येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सिमेंट बंधारे, ओढे, नाले पाण्याने भरले आहेत. घाटमाथ्यावरील अग्रणीनदीला पाणी आले आहे. लोकसहभागातून बांधलेले बंधारे पाण्याने भरले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकावलेल्या पिकांना उपलब्ध पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.