सोलापूर : सोलापूर शहर – ग्रामीणचा आतापर्यंतचा अहवाल पाहता एकूण बाधितांचा आकडा 13 हजार पार झाला आहे. कोरोनाबळीची संख्या 592 आहे. साडेआठ हजाराहून अधिकजणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या ग्रामीणचा बाधितांचा आकडा वाढत आहे. सध्या तर शहराच्या तुलनेत दीड हजाराने (1,585) ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या अधिक आहे. तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण शहरात जादा (199) असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र शहरात अधिक आहे.
15 अॉगस्टपर्यंतचा अहवाल पाहता शहरात कोरोनामुक्तीची संख्या 4 हजार 479 तर ग्रामीण 4 हजार 280 आहे. बाधितांचा आकडा शहरात 5 हजार 805 तर ग्रामीणमध्ये 7 हजार 390 आहे. मृत्यूची संख्या पाहता शहरात 387 तर ग्रामीणमध्ये 205 आहे. एकूण शहर – ग्रामीण बाधित 13 हजार 195, मृत्यू 592 तर कोरोनामुक्त 8 हजार 759 असा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 194 पुरुष तर 136 महिलांचा समावेश होतो. 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.काल शनिवारच्या अहवालात शहरात सुदैवाने मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र ग्रामीणमध्ये आठजणांचा मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काल शनिवारी, यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता.मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.