सोलापूर : मुलतानी बेकरीकडून आसरा चौकाकडे रस्त्याच्या विरुध्द दिशेने जाणारा ट्रक विजापूर नाका पोलिसांनी गुटख्याची 50 पोती गुटखा जप्त केला. या गुटख्याची अंदाजे किंमत 21 लाख रूपये आहे. पोती जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे तर दोघांना ताब्यात घेतले असून ट्रकसह 35 लाख 52 हजारांचा मुद्देमाल विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जोडभावी पोलिस ठाण्याजवळील आळंद मोटार गुड्सच्या गोदामामधून 50 पोती गुटख्याची भरुन ट्रक (एमएच-06, एक्यू-8142) यादगिरी (कर्नाटक) येथे निघाला होता. संजीव सिध्दलिंग कोळी (रा. सन्मित्र नगर, शेळगी) याने माल भरला होता. गुटखा लपविण्यासाठी ट्रकच्या मागील बाजूस मुलतानी बेकरी येथून बेसनची पोती भरली होती. हा माल कर्नाटकातील यादगिरी येथे जाणार होता. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कल्याणी शंकर तेजमने (मटकी रोड, आळंद, जि. कलबुर्गी) आणि संजीव कोळी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा (50 पोती) आणि बेसन व ट्रक असा 35 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, भीमाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, लखन माळी, रोहन ढावरे, आलम बिराजदार, विशाल बोराडे, बालाजी जाधव आणि लक्ष्मण वसेकर यांनी केली.