नवी दिल्ली : संसदेच्या अॅनेक्स इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संसदेतील ही आग सहाव्या मजल्यावरुन लागल्याची माहिती मिळत आहे. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
संसदेतील ही आग सहाव्या मजल्यावरुन लागल्याची माहिती मिळत आहे. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत. सकाळी 7.30 वाजता आग लागली होती. यानंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली.