मोहोळ : गुन्हे शाखेच्या पथकाने औढी ( ता. मोहोळ ) जवळ अशोक लेलंड कंपनीच्या गाडीसह साडेबारा लाखाचा गुटखा पकडून तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक पेंट्रोलिग करत असताना वडदेगाववरून औंढी गावाच्या दिशेने अशोक लेलंड दोस्त कंपनीची (गाडी क्र. एमएच ४५ एएफ ३७२७) यात गुटखा, जर्दा बंदी असलेले पदार्थ असल्याचा संशय आहे, अशी खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंच तयार करून त्यांना माहिती देवून औंढी चौकात गाडीची वाट पाहिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गाडी येताच थांबण्याचा इशारा केला असतानाही तसाच पुढे निघून गेला. गाडीचा पाठलाग करून औंढी गावाच्या पुढे अर्धा किमी अंतरावर त्या गाडीच्या पुढे गाडी घालून त्या चालकास थांबण्यास भाग पाडले. यावेळी एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने ज्ञानेश्वर भारत वरवडे (रा. मोडनिंब ता. माढा ) असल्याचे सांगीतले. पळून गेलेल्या इसमाच नाव अब्दुल सुलतान शेख, व शेजारी बसलेला अजय संदिपान शिंदे अशी नावे सांगितले.