मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मुंबई महापालिकेकडून त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिकेकडून त्यांना पुढील 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नवनीत राणा यांना रविवारी रात्री लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (17 ऑगस्ट) पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांना कोरोना चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. पालिकेच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.
नवनीत कौर राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नवनीत राणा यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.