मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. “आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही,” असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की सीबीआयने यासंदर्भातील दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. तसंच विरोधकांकडूनही सातत्याने आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात होता. यावरुन स्वत: आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.
त्यावर आता रियानेच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, “मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. तसंच कधी फोन वर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे.”
* माझं मौन माझा कमकुवतपणा नाही
रिया म्हणाली की, “मी सुशांतकडून कधीही पैसे घेतले नाही. मुंबई पोलीस आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सगळ्या दस्तऐवजांची तपासणी केली आहे. त्यांना माझ्याविरुद्ध काहीही संशयास्पद सापडलेलं नाही.” तसंच मी तिसऱ्या तपास यंत्रणेच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही रियाने म्हटलं. मुंबई पोलीस आणि ईडीने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक, फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवाल घेतला आहे. बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर और इलेक्ट्रोॉनिक डेटा हे सगळं दोन्ही यंत्रणांकडे आहे, पण माझ्याविरोधात काहीही संशयास्पद सापडलेलं नाही, असं रिया म्हणाली.
रियाने म्हटलं आहे की, मीडियाने कोणत्याही अटकळ बांधू नये. माझं मौन माझा कमकुवतपणा नाही. सत्य कधीही बदलत नाही. मृत्यूच्या 40 दिवसांनंतर बिहार पोलिसांचं समोर येणं हास्यास्पद आहे. सुशांतच्या कुटुंबीयांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सुशांत वारंवार कुटुंबाला फोन करत होता.