मुंबई : कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील आंतर जिल्हा एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. यामुळे राज्यातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नव्हती. आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
अनेक दिवसांपासून एसटी सुरू करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थातच या प्रवासासोबत अनेक अटी शर्थी लागू असणार आहे. परंतु खासगी वाहनांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनलॉकचे नियम हळूहळू शिथिल होत असताना राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे. जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.
* महामंडळाच्या मोकळ्या जागेवर इंधनपंप चालू होणार
लॉकडाऊन काळात बस सेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.
सह्याद्री येथे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि 5 ठिकाणी एल.एन.जी.पंप सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.