नवी दिल्ली : आज बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार राष्ट्रीय भरती एजन्सीला (NRA) केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा यापूर्वी तरुणांना घ्याव्या लागत होत्या, पण आता निर्णयामुळे केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.
20 भरती एजन्सी देशात आहेत, म्हणून विविध विविध ठिकाणी प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. कोट्यावधी तरुणांना याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी करण्यात येत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युवा पिढीसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी नोकरी संदर्भात केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवापिढी एक ना अनेक परीक्षांना सामोरे जात असतात. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा मोठ्या आशेने देत असतात. केंद्र सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी आता सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल.
“युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.” अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.