नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार सलमान खानच्या हत्येसाठी मुंबईत रेकी करणाऱ्या गुंडाच्या क्राइम ब्रँच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेला गुंड हा भिवानीतील रहिवासी असून, तो लॉरेंस बिश्नोई टोळीसाठी काम करतो. लॉरेन्स बिश्नोई यानेच त्याला रेकी करण्यासाठी पाठवल्याची माहिती आहे.
गँगस्टर बिश्नोईच्या सांगण्यावरून त्याने सलमान खान याच्या हत्येसाठी मुंबईत रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. आगामी ‘किक २’ आणि बिग बॉस या शोमुळे सध्या सलमान खान पुन्हा चर्चेत आला असताना ही घटना उघडकीस आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल याने याआधी चार जणांची हत्या केली आहे. ऑगस्ट २०१९मध्ये झज्जरमध्ये त्याने एका व्यक्तीची हत्या केली होती. लॉरेंस बिश्नोईच्या सांगण्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये पंजाबच्या मनोतमध्ये एकाचा खून केला होता. तसेच २० जून २०२० रोजी त्याने भिवानीतही एका व्यक्तीची हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, राहुल याने २४ जून २०२० रोजी फरीदाबादच्या एसजीएम नगरमध्ये हत्या घडवून आणली होती. एनसीआरमधील गँगस्टर बिश्नोईसाठी राहुल हा काम करतो. क्राइम ब्रँचने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली. अनेक घटनांमध्ये सामील असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.
आरोपी राहुल हा एनसीआर येथील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी काम करतो. आताही क्राईम ब्रॉंचने त्याला उत्तराखंड येथून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने सलमानच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे म्हटले आहे.