मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं स्पष्ट झालं आहे. लवकरच तो अमेरिकेत तीन महिन्यांच्या उपचारांसाठी जाणार आहे. दरम्यान, काल मंगळवारी तो बहिण प्रिया दत्त हिच्यासोबत कोकिलाबेन रुग्णालयात काही चाचण्यासाठी दाखल झाल्याची माहिती आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय दत्त रुग्णालयात जाण्यासाठी निघाला असताना त्याची पत्नी मान्यता दत्त, बहिण प्रिया. आणि नम्रता दत्तही या त्याच्यासोबत होत्या. या सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता दिसून येत होती. घराबाहेर जमा झालेल्या पत्रकार आणि फोटोग्राफर्संना संजयनं थम्सअप करून तो या कर्करोगाशी लढा देण्यासाठी चालला असल्याचं सांगितलं. त्याच्या चेहरा देखील काहीसा उदास असा दिसत होता. पत्रकार आणि फोटोग्राफर्सनी त्याला तब्येतीविषयी विचारणा केली असता त्यानं ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’, असं भावुक आवाहान केलं. त्याचे हे शब्द ऐकूण मान्यता दत्त देखील भावुक झाली आणि संजयला ‘जादू की झप्पी’ दिली.
संजय दत्तला ८ ऑगस्ट रोजी रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गळ्यात पाणी जमा झाल्यानं त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्याची कोरोना टेस्टही करण्यात आली. पण ही टेस्ट निगेटिव्ह आली. फिल्मफेअर पोस्टनुसार संजय दत्तच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी झाली होती. त्याच्या फुफ्फुसांत पाणी जमा झालं होतं आणि याचमुळं त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याची कर्करोगाची चाचणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे.