सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी आणखी 9 जणांचा कोरोनामुळेे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 631 वर पोहचली आहे तर बुधवारी आणखी 287 जणांची बांधितांमध्ये नव्याने भर पडली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 14 हजार 473 वर गेली पोहचली आहे.
आज बुधवारी आलेल्या अहवालानुसार शहरात 1 हजार 171 जणांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 1 हजार 150 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ग्रामीण भागात 1 हजार 664 जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 1 हजार 406 निगेटिव्ह तर 258 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी शहर व जिल्हा मिळून 189 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी मृत्यू पावलेल्यांमध्ये मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील 53 वर्षीय पुरुष, कामती खु येथील 77 वर्षीय पुरुष पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील 80 वर्षीय पुरुष, शेगाव दुमाला येथील 67 वर्षीय पुरुष, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 63 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील वैराग भागातील 72 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यताील मनगोळी येथील 27 वर्षीय पुरुष, फताटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरातील समर्थनगर परिसरातील 72 वर्षीय पुरुषाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज बुधवार अखेर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 18 हजार 519 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये 1 लाख 18 हजार 330 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 3 हजार 858 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 हजार 473 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी 189 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 983 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 9 हजार 859 जण कोरोनामुक्त होवून यशस्वीरित्या घरी परतले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी घ्यावी तसेच लक्षणे दिसून येताच डॉक्टरांना भेटावे तसेच वेळीच उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.