नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयनं सीबीआयकडे सोपवली आहे. गुंतागुंती वाढलेल्या प्रकरणाचा तपास आता नेमकं कोण करणार याचा निकाल सर्वोच्च न्यायालय आज दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयनं सीबीआयकडे सोपवली आहे. सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने विरोध केला होता. आता मुंबई पोलिसाला सीबीआय तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
पाटण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपास मुंबई पोलिसांकडे देण्याबाबत रियाने याचिका दाखल केली होती. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून मुंबई पोलीस करत असून माझा जबाब मी त्यांच्याकडे नोंदवला आहे, असं रियानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं. आपण सुशांतची गर्लफ्रेंड असल्याचं रियाने सांगितलं आहे. पण सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाचा मृत्यू रियामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 25 जुलैला पाटण्यातील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात आले असून त्यांनी तपास कार्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी बिहार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. तेव्हा रियाने तपास यंत्रणेच्या अधिकार क्षेत्रावरून प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता नेमकं कोण करणार याचा निकाल सर्वोच्च न्यायालय आज दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयनं सीबीआयकडे सोपवली आहे.
सुशांतच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी रिया डिसेंबरमध्ये शिफ्ट झाली आणि 8 जून 2020 पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 8 जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं. 14 जून रोजी राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. डिसेंबर 2019 मध्ये रिया सुशांतच्या घरी राहायला गेली असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलं. एप्रिल 2019 मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले.
सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. याविषयी तिच्या वकिलांनी पुढे म्हटलं, “रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती. मुंबई पोलीस व ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील नातं आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत कसून चौकशी केली.
“याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपुर्द करण्यात आला आहे.