हैदराबाद : तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या 25 वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे.
महिलेनुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचाराचा शिकार बनली आहे. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे. या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत. त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.