अहमदनगर : बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी एका मुस्लिम असलेल्या बाबाभाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. आई दरवर्षी बाबाभाईना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही. वाचा सविस्तर महाराष्ट्रात आणखीही सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि मानवता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावातील ही घटना आहे. खरंतर हीच आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणूसकी हा खरा धर्म प्रत्येकाला ओळखता येणं गरजेचं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव जवळील मुंगी या छोट्या गावात एका लग्नात एका मुस्लीम मामाने आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलीचं कन्यादान केलं आहे. इतकंच नाही तर लेकही बापाला निरोप देताना जशी रडते तसं अश्रू तिच्या डोळ्यांत होते. या घटनेची आज सर्वदूर चर्चा होत आहे.
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. एखादा सलीम दाढी टोपी सहित ज्यावेळी एखाद्या मित्राच्या लग्नांत अक्षदा वाटताना किंवा पंगतीला आग्रहाने जेवण वाढताना दिसतो तर कधी एखादा राम अब्दुलच्या इथे त्याच्या वृद्ध आई वडलांना मदत करताना दिसतो.
बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
बोधेगाव इथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आई-वडिलांकडे राहत आहेत. माहेरीच छोटं-मोठं काम करून त्यांच्या मुलींना मोठं केलं. मुलींच्या आईला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे.
बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन भावाचे कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली.
आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही. भावाची व मामाची भूमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली. हेच बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
* बोधेगावमधील बाबाभाईचा बंधुभाव
बाबाभाई पाच वेळेचे नमाजी असून एक ईश्वरवादी एका अल्लाहला मानणारे आहेत. परिसरातील बहुसंख्य जण बाबाभाईच्या अस्थेचा आणि धार्मिक प्रथाचा आदर करतात तर इतरही धर्मातील आस्था याचा बाबाभाई आदर करतात. बाबाभाई आणि बोधेगावमधील हाच बंधुभाव भारतात पाहण्यासाठी मिळतो जो इतर कुठेही पाहायला मिळत नाही काही राजकीय आणि धार्मिक द्वेषाच्या बुद्धीने वावरणाऱ्या मानसिकतेमुळे वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली जाते. पण या देशातील वटवृक्षाची बीजे हि प्रेमाने भरलेली असतात. त्यांना आधार देण्याचं काम बाबाभाई तसेच बोधेगावच्या ग्रामस्थांसारखे लोक करत असतात.