सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची ग्रामीण भागातील संक्रमितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंढरपूर, बार्शी या दोन तालुक्यांतील रुग्णसंख्या रोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी शहरात 58 आणि ग्रामीण भागात 265, अशा 323 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. शहरात एक आणि ग्रामीण भागातील 8, असा 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी एकाच दिवशी ग्रामीण भागातील 650 आणि शहरातील 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरासह ग्रामीण भागात मिळून कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 474 वर पोहोचली असून मृतांची संख्या 655 झाली आहे. 11 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर शहरात शनिवारी 1 हजार 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शनिवारअखेर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 27 हजार 980 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 26 हजार 825 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 12 हजार 332 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 15 हजार 474 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी 155 जणांचे अहवाल येणेबाकी आहेत.
* शनिवारच्या अहवालातील 9 मृत्यू
ग्रामीण भागात मृत्यू झालेल्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथील 40 वर्षीय पुरूष, माळशिरस तालुक्यातील संगम येथील 63 वर्षीय महिला, बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील 75 वर्षीय पुरूष, बार्शी शहरातील उपळाई रोड येथे राहणारे 28 वर्षीय पुरूष, बार्शी शहरातील कासारवाडी रोड परिसरातील 65 वर्षीय पुरूष, माढा तालुक्यातील चिंकहिल येथील 56 वर्षीय पुरूष, करमाळा शहरातील एस. टी. कॉलनीतील 84 वर्षीय पुरूष, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील 80 वर्षीय पुरूष, तर शहरातील भवानी पेठ परिसरात राहणार्या एका 81 वर्षीय पुरूषाचादेखील मृत्यू झाला आहे.
* पंधरा हजार पार; ग्रामीणची चिंता
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत 9 हजार 211 जण कोरेानाबाधित आढळून आले आहेत. शहरात 6 हजार 263, असे एकूण 15 हजार 474 जण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 11 हजार 178 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत शहरात 397, तर ग्रामीण भागात 258, अशा एकूण 655 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील 1 हजार 188 जणांवर आणि ग्रामीण भागातील 2 हजार 473 अशा एकूण 3 हजार 661 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.