मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ‘ सुशांतकडे घरकाम करणाऱ्या नीरज सिंहने चौकशीत सुशांतशी निगडीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा दावा त्याने यावेळी केला. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात नीरजने ही माहिती दिली.
मृत्युच्या काही दिवस आधी त्याने सुशांतसाठी गांजाचे रोल बनवून दिले होते. सुशांतचा मृतदेह आढळला त्या दिवशी त्याने चरस ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला. तेव्हा तो बॉक्स नीरजला रिकामा आढळून आला होता. हिंदी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नीरजने मुंबई पोलिसांना तीन पानांचा जबाब दिला आहे.
एका ओळखीच्या माणसाच्या मध्यस्थीने नीरज सुशांतच्या घरी काम करायला सुरुवात केली. नीरज सफाई, कुत्र्याला फिरवणं, स्वयंपाक करण्याचं काम करायचा. यासोबतच सुशांतशी संबंधित इतर गोष्टींची काळजीही करत होता. रजत मेवाती, सिद्धार्थ पिठाणी, आयुष, सॅम्युअल मिरांडा, आनंदी, सॅम्युअल हॉकीब, अशोक केशव खासू हे सुशांतसाठी काम करायचे. यानंतर सुशांतने डिसेंबर २०१९ मध्ये जॉगर्स पार्क वांद्रे येथील फ्लॅटमध्ये रहायला गेला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी आपल्या घरात आनंदी, रिया, आयुषसोबत पार्टी करायचा. या पार्ट्यांदरम्यान सुशांत दारू आणि गांजा, सिगारेट ओढायचा. सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजा सिगारेटचा रोल बनवायचा. कधीकधी मीही रोल करून देत होतो. मी तीन दिवस सुशांतसाठी रोल बनवत होतो. हे रोल घरात जिन्याच्या खालील कपाटात एका सिगरेट केसमध्ये ठेवले होते. सुशांत सरांच्या मृत्यूनंतर मी तो सिगारेटचा बॉक्स पाहिला. तेव्हा तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटलं आहे.