नवी दिल्ली : काँग्रेसमधल्या अध्यक्षपदाच्या नाट्याने दिल्लीतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस कार्यकारी समितीच्या वादळी बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. हीच संधी साधत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर शरसंधान केले आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आता राजकारणातून नेहरु आणि गांधी घराण्याचं अस्तित्व संपलं अशी टीका उमा भारती यांनी केलीय.
उमा भारती म्हणाल्या, काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे पक्षाची स्थिती दिसून येते. पक्षाने आणि खऱ्या गांधी वादाकडे गेलं पाहिजे. पक्षाला विदेशी नाही तर स्वदेशी गांधींची गरज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विदेशी गांधीमुळे पक्षाचं भलं होणार नाही, असंही त्या म्हणाल्या. उमा भारती यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कार्यसमितीची आजची बैठक वादळी ठरली आहे. सोनिया गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव. त्यानंतर राहुल गांधी यांचं कथित वक्तव्य आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा यामुळे दिल्लीचं वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे.