पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेने ३१ अॉगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. माञ आंदोलनाच्या अगोदर प्रशासनाने मुख्यमंञ्यासमवेत बैठक घडवून आणत तोडगा काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर येथे आयोजित पञकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, ह. भ. प. तुकाराम महाराज चवरे आदीसह वारकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांच्या उपस्थितित बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माञ या बैठकीत तोडगा निघणार नाही. यासाठी मुख्यमंञ्यासमवेत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.