सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या अहवालानुसार कोरोनाग्रस्तापेक्षा कोरोनावर मात करणार्या रूग्णांची संख्या अधिक आहे. आज 36 कोरोनाग्रस्ताची भर पडली आहे. मात्र तब्बल 118 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 77 पुरूष आणि 41 महिला रूग्णांचा समावेश आहे. आज शहरातील कोरोनाबळीच्या आकड्याने दुर्दैवाने चारशेचा टप्पा पार केला आहे.
मार्कंडेय हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार घेणार्या एक महिला आणि पुरूषाचा आज मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 401 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 343 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 702 तर 2 हजार 641 महिला रूग्णांचा समावेश आहे. आज मार्कंडेय हॉस्पिटल उपचार घेणार्या रेल्वे लाईन परिसरातील 63 वर्षाचे पुुरूष , सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तेलंगी पाच्छा पेठ भागातील 65 वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 401 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 268 तर महिला 133 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 374 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 340 अहवाल निगेटिव्ह तर 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 56 हजार 787 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 50 हजार 409 तर पॉझिटीव्ह 6 हजार 343 आढळून आले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 86 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 856 आहे.