टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काल रविवारी दोन महिलांचे तर आज १७ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत शहराची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ झाली आहे.
रविवारी ५२ जणांचे चाचणी घेण्यात आलेल्यांचे आणखी अहवाल येणे बाकी आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता टेंभुर्णी शहर कमीत कमी सात दिवस बंद ठेऊन जनता कर्फ्यु पाळण्याची मागणी नागरीकांतून होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांचे संपर्कात आलेल्या ४० जणांचे शुक्रवार चाचणी घेण्यात आले होते. त्याचे अहवाल आज आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयातील नर्सच्या संपर्कात आलेल्या नवीन स्टँडच्या मागील ८ जण ४ पोलीस कर्मचारी तर शुक्रवार पेठेतील ३ एक नर्स आणि बारवे मळ्यातील १ असे १७ जण टेंभुर्णीतील तर सुर्लीच्या रुग्णांचे संपर्कातील ४ रुग्ण आढळले आहेत.
टेंभुर्णीतील काल ५२ जणांचे स्वॕब घेतलेल्यांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत. यामधील कोरोबाधित रुग्णांचा आकडा किती. याची उत्सुकता लागून राहिली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी कोरानाची साखळी तोडण्यासाठी टेंभुर्णी ७ ते १० दिवस बंद ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.