सांगली : सांगलीत कोरोनाचा कहर झाला आहे. सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात आज अखेर 5 हजार 417 रुग्णसंख्या झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात 23 मृत्यू झाले आहेत. तर नवीन 444 बाधित रुग्णांची भर पडलीय. जिल्ह्यातील 5 हजार 759 रुग्ण आज अखेर बरे झाले आहेत.
आता सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या 9 हजार 414 वर पोहोचली आहे. आज आखेर 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचाराखाली 3 हजार 272 रुग्ण आहेत. बुधवारी 1336, rt-pcr टेस्ट घेण्यात आलेल्यापैकी 324 रुग्ण आढळून आले. 440 अँटीजन टेस्टपैकी 136 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुकानिहाय बुधवारची नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्या – आटपाडी 16, जत 2, कडेगाव 14, कवठेमहांकाळ 35, खानापूर 13,मिरज 56,पलूस 45, शिराळा 20, तासगाव 33, वाळवा 15, सांगली 116, मिरज 79, असा समावेश आहे.
आजच्या मृतांमध्ये सांगली, मिरज, कुंडल, तासगाव, आष्टा,कवलापूर, मालगाव, पलूस, मालेवाडी, बुधगाव, कचरेवाडी, लिंगनूर, मनेराजुरी, उपळावी, मसुचीवाडी,वाळवा, येथील रुग्णांचा समावेश आहे.
530 रुग्ण अतिदक्षता विभागात सध्या उपचार घेत आहेत. यापैकी 417 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. बाकीचे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आज एकूण 207 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज अखेरची रुग्णसंख्या 9 हजार 414 वर पोहोचली असली तरी यापैकी 5 हजार 759 रुग्ण बरे झाले आहेत . प्रत्यक्ष उपचारास खाली 3 हजार 272 रुग्ण आहेत.