सोलापूर : जुळे सोलापूर येथील नवीन संतोषनगरमधील सुनिता पाटील यांनी महालक्ष्मीसमोर ‘कोव्हीड योद्धा सन्मान’ हा देखावा सादर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याची सुंदर मांडणी केली आहे.
कोरोना या संकटाला सामोरं जात असताना डॉक्टर, नर्स पॕरामेडीकल, पोलीस, होमगार्ड, सफाई कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक , पत्रकार, शेतकरी यासह शासन व प्रशासनातील सर्व घटक यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी कोव्हीड योद्धा सन्मान हा देखावा सादर केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या देखाव्यात प्रशांत पाटील यांच्या कोरोना संदर्भाने लिहलेल्या कवितांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोलीस ऋण, डॉक्टर देव, कोरोना पाठ युद्ध जिंकणारच आदी प्रबोधनात्मक कवितांचा समावेश आहे. यामागील भूमिका व्यक्त करताना सौ.पाटील यांनी सांगितले की, कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या महालक्ष्मी म्हणजे खरीप व रब्बीच्या धान्यलक्ष्मी प्रसन्न व्हाव्यात व भरभरुन याव्यात या श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो. याला अनुसरुन भारत कोव्हीड मुक्त होण्यासाठी कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून हा देखावा सादर केला असल्याचे सांगितले.
“कोव्हीड योद्धे व नागरिकांच्या सहकार्याने लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करते”
सुनिता पाटील – संतोष नगर, जुळे सोलापूर