मुंबई : रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी. कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात आज परिचारिकांनी आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनमार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये नर्सेसनी हे आंदोलन केलं.
नाशिकमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारांकांकडून आज सकाळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येत निषेध नोंदवण्यात आला. परिचारिकांनी मोठ्या संख्येने यात आपला सहभाग नोंदवला होता.